पनवेल(प्रतिनिधी)- थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व एम. जी. एम. हॉस्पीटल रक्तपेटी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने काल खांदा कॉलनी येथे आयोजित रक्तदान शिबिरात १६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. - खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खा.रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेलमध्ये स्व.जनार्दन नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सचिव डॉ. एस. टी.गडदे, संचालक संजय भगत, प्राचार्य डॉ. व्ही. डी. ब-हाटे, अनिल कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पनवेलमध्ये स्व.जनार्दन भगत जयंतीनिमित्त १६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
• Dainik Lokdrushti Team