उरणच्या सागरकन्येचा घारापुरी ते गेट वे ऑफ इंडिया नवा विक्रम


उरण (वार्ताहर) - समुद्राचं पाणी म्हटलं की अनेकांची पाचावर बसते. मात्र उरणमध्ये वास्तव्यास असणारी मुळची अलिबाग शहाबाज येथील ९ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर याच समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवनवीन विक्रम करत आहे. रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे २३ किमी. अंतर पोहून पार केल्यानंतर तिने घारापुरी ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमी. अंतर पोहून पार केले आहे. तिने केलेल्या या धाडसी विक्रमामुळे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. समुद्री प्रवाह, उंच लाटा, मोठं मोठी जहाज यामधून मार्ग काढत निर्धारित वेळेपेक्षा २६ मिनिटे आधी हा विक्रम तिने पूर्ण केला आहे. समुद्राचं पाणी म्हटलं की भल्या भल्यांची बोबडी वळते, मात्र या ९ वर्षीय रुद्राक्षीने याच समुद्राच्या लाटांवर स्वार होत हा विक्रम केला आहे. तर धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरच अंतर पोहून जाण्याचं तीच पुढील लक्ष आहे. तिच्या या यशस्वी प्रयत्नांमध्ये आर्यन मोडखरकर, ओमकार कोळी, प्रिया गुप्ता आणि आर्य पाटील यांनी साथ दिली. तर या यशाचे श्रेय ती आपले प्रशिक्षक हितेश भोईर यांना देत आहे. तसेच यापुढे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किमी. अंतरासाठी तिची तयारी करण्यात येणार असून, परदेशातही आपला ठसा उमटवण्यासाठी तिची तयारी करून घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वरुद्राक्षीची आई, वडील यांनी तिने केलेल्या या विक्रमाबाबत समाधान व्यक्त केले असून, तिने अश्याआप्रकारचे विक्रम करावेत असे म्हणत वृद्राक्षि टेमकर ही जलतरण याच क्षेत्रातच पारंगत नसून, अभ्यासातही हशार असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे वाचन, चित्रकला, गायन यासारख्या कलांमध्येही ती पारंगत असल्याने तिच्या शाळेतूनही तिला अधिक प्रोत्साहन मिळत आहे.