नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका आंतरशालेय कला सांस्कृतिक स्पर्धेस काल उत्साहात प्रारंभ झाला. या आंतरशालेय सांस्कृतिक कला महोत्सवात नवी मुंबई महापालिकेच्या ७४ शाळांतील १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शालेय स्तरावर प्राथमिक फेरी व केंद्र स्तरावर उपांत्य फेरी घेण्यात येऊ न त्यामधून अंतिम फेरीसाठी नृत्य, गायन व अभिनव सादरीकरण या तीन क्षेत्रांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या निवडक अंतिम फेरीतील स्पर्धकांनी काल वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्तम सादरीकरण केले. नवी मुंबई महापालिका आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धा २०१९-२०२० तथा कलाविष्कार २०२०चे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती स्पर्धा निमंत्रक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका अनिता मानवतकर, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, स्पर्धेच्या परिक्षक संगीत विशारद मानसी जोशी, नृत्य अलंकार डॉ. रुपाली देशपांडे, अभिनेत्री जानकी पाठक आणि इतर मान्यवर तसेच पालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धेस प्रारंभ