नवी मुंबई (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबईत विविध प्रकारच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्याबरोबरच कोणता प्रभाग आपल्या उमेदवारास फायदेशीर ठरेल अश्या विविध बाबींवर चाचपणी करण्यावर राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे. नवी मुंबई काँग्रेस पक्षातर्फे त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे व त्याचाच एक भाग म्हणून __ काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून कालपासून काँग्रेस भवन येथून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली असल्याची माहिती नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली. रविवारी दि.१ मार्च पर्यंत इच्छुकांसाठी अर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील १११ प्रभागांसाठी एक सदश्य पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. राज्याच्या धर्तीवर नवी मुंबईतही आघाडी करून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीची वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात नेत्यांकडून घेण्यात आला आहेत्यानुसार नवी मुंबईत शिवसेना-काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आघाडी करून महाविकास आघाडी मार्फत ही निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत काँग्रेस ही मोठ्या ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. सद्या नवी मुंबई महापालिकेत काँग्रेसचे दहा नगरसेवक आहे. त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी आता पासूनच कामाला लागली आहेत. तसेच महा विकास आघाडीकडून जास्त जागांची अपेक्षा करताना पाहिले स्वतःची ताकद काँग्रेसकडून चाचपली जात आहे. त्याकरिता सोमवार पासून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी अर्ज घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याने गर्दी केली सोमवार २४ फेब्रुवारीपासून सुरु झालेली ही मोहीम रविवार दि. १ मार्चपर्यंत सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत काँग्रेस भवन येथे अर्ज उपलब्ध असणार आहेत. तसेच २४ फेब्रुवारी ते ५ मार्च या मुदतीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस भवन येथे स्वीकारले जाणार आहेत. या अर्जात उमेदवाराला स्वतःच्या माहितीसह प्रभागाची माहिती द्यावी लागणार आहे. उमेदवाराचे ब्लॉकमधील यादीतील नाव, अपत्यांची माहिती, पक्षातील भूषविलेले पदे व जबाबदाऱ्या, सद्या पक्ष संघटनेत असलेले पदउमेदवारांवर सुरू असलेली न्यायालयीन कारवाईची माहिती, असल्यास गुन्ह्यांची माहिती आदी माहिती भरून अर्ज सादर करायचे आहेत. होती.
Box-----
इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल दि. २४ फेब्रुवारीपासून इच्छुकांसाठी सुरु झालेली ही अर्ज वाटप प्रक्रिया रविवार दि. १ मार्च पर्यंत चालणार आहे. नवी मुंबईत काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढविणार याबाबतचा निर्णय सर्वस्वी बैठकीतून वरिष्ठांकडून घेतला जाईल. - अनिल कौशिक नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष