पनवेल (प्रतिनिधी) - बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेकद्वारे कंपनीच्या खात्यातून 4 कोटी 10 लाख रुपरे फसवणूक करणार्या 7 जणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
आरसीआरसीआर बँक शाखा पनवेल रेथे एका अनोळखी इसमाने हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिरा प्रा.लि. रा कंपनीचे बनावट लेटरहेड बनवून त्यावर कंपनीचा रबरी शिक्का मारुन खोट्या सह्या करून नमूद कंपनीच्या नावे बँकेत असलेल्या खात्याचा मोबाईल क्रमांक बदली करण्याठी सदरचे लेटरहेड बँकेत देवून बनावट चेकद्वारे नमूद कंपनीच्या खात्यात असलेली 4 कोटी 10 लाख रुपरे किंमतीची रक्कम आर.के.एंटरप्रारझेस याचे इंड्सइंड बँकेतील खात्रात वर्ग करून बँकेची एकूण 4 कोटी 10 लाख रुपराची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने तपासात आराफत हनिफ शेख (33, धंदा वकील), रामकिशन लुलारकनाथ पांडे (51, धंदा एक्सपोर्ट), अमिताभ ओरोविदो मित्रा (61 धंदा कन्सलन्टंट), विनोद मधुकर भोसले (44 धंदा कंन्स्ट्रक्शन), जावेद हबीब अहेमद कुरेशी (55), श्रीजील मोहनन कुरपम्बील (39 धंदा) व आरसीआरसीआर बँक जुनी पनवेल शाखा सेल्स मॅनेजर मुकेश लक्ष्मणप्रसाद गुप्ता (45) आदींनी संगनमत करून सदर रक्कम वळती केल्याचे उघड झाले. त्यानुसार या सातही जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सह.पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अजरकुमार लांडगे यांच्यासह सहा.पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, ईशान खरोटे, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस नाईक पंकज पवार, दिनेश जोशी, अजर कदम, राहूल साळुंखे, केशव शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
बनावट दस्ताऐवजाद्वारे कंपनीच्या खात्यातून 4 कोटी 10 लाख लांबवले!