(प्रतिनिधी)- तुर्भे परिसरातील एमपीएमसी बाजारात काल स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या घटनेतून एपीएमसी बाजार समिती प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. या घटनेमुळे येथील ट्रान्सपोर्टर, व्यापारी, ग्राहक आणि माथाडी कामगार यांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे. एपीएमसीमधील दाना मार्केट कार्यालयाचा स्लॅब परिसरातील एम.गल्ली येथील प्रवेशद्वारालगत असलेल्या रिटेल ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात कामादरम्यान सदरचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती टक्केचे भूखंड रद्द करण्याला स्लॅब कोसळला मिळताच घटनास्थळी दाना मार्केट मधील व्यापारी पोपटलाल भंडारी हे तात्काळ पोहोचले व त्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात पाठवले. दाना मार्केट मध्ये एम गल्ली येथे रिटेल ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्यालय आहे. या कार्यालयातुन मुंबई,ठाणे, कल्याण आदी भागात माल पाठवला जातो. या मालाचा पूर्ण हिशोब येथेच पहिला जातो. या कार्यालयाच्या आवारात बसलेले तिघे कामगार स्लॅब कोसळून जखमी झाले आहेत. या घटनेमुळे ट्रान्सपोर्टर, व्यापारी, ग्राहक आणि माथाडी कामगार सुरक्षित कधी होणार ? अशी संतप्त प्रतिक्रिया ट्रान्सपोर्टर यांनी व्यक्त केली आहे.
एपीएमसी दाना मार्केटमधील कार्यालयाचा स्लॅब कोसळला