शिरवणे परिसरात सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींची नामकरणे


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ८१, शिरवणे येथील विविध मार्ग, चौक, मार्केट, सभागृह यांचे नामकरण महापौर तथा स्थानिक नगरसेवक जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रध्दा गवस, नगरसेविका अनिता मानवतकर, माजी नगरसेविका माधुरी सुतार, डॉ. राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ___ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर जयवंत सुतार यांच्यामार्फत शिरवणे प्रभागातील मांडण्यात आलेल्या सर्वानुमते मंजूर ठरावानुसार ठाणे-बेलापूर रस्त्यापासून मातोश्री निवासाजवळून गणेश मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास शिरवणे गावातील नामांकित सामाजित कार्यकर्ते कै.भालचंद्र उंदीर पाटील गणेशवाडी मार्ग, शिरवणे मार्केट इमारतीस शिरवणेगांव मार्केट, शिरवणे मासळी मार्केटचे महिला सक्षमीकरणासाठी त्याकाळी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कै.बनूबाई बळवंत घरत मासळी मार्केट अशी नामकरणे करण्यात आली. तसेच शिरवणेगाव मार्केट इमारतीत तळमजल्यावर बांधलेल्या भाजी मार्केटला नवी मुंबई वसण्यापूर्वीच्या कालखंडात शेती कामासाठी अवजारे बनविणारे कारागिर व कृषी संस्कृतीतील सामाजिक कार्यकर्ते कै.सिताराम बाळा ठाकूर भाजी मार्केट, शिरवणे गांव मार्केट इमारतीत पहिल्या मजल्यावरील सभागृहाचे माजी सरपंच कै. नथुगणा घरत सभागृह, शिरवणे गांव मार्केट इमारतीत दुस-या _ मजल्यावरील सभागृहास कै.नारायण सिताराम सुतार (सोनखार पोलीस पाटील) सभागृह असे नामकरण करण्यात आले. तर प्लॉट क्र. ३३,१३२, ६०६ या ठिकाणी निर्माण झालेल्या चौकास माजी सरपंच कै. बुधाजी आंबो म्हात्रे चौक, प्लॉट क्र.१९४, ७१, ६७८, ७० यामधून जाणा-या रस्त्यावरील चौकास ग्रामपंचायत सदस्य कै.गणपत महाढू घरत चौक, भूखंड क्र. ३३ व त्रिवेणी को. ऑप. हौ. सोसायटी, भूखंड क्र. ५५९ बी पासून जाणा-या रस्त्यास नामांकित पखवाज वादक व नाट्य कलावंत कै.रमेश दामू सुतार मार्ग अशी नामकरणे संपन्न झाली.