पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या झालेल्या महासभेमध्ये मराठा समाजाच्या मुलांसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कळंबोली येथे भव्य वस्तीगृह उभारण्याच्या ठरावासह अन्य महत्वपूर्ण प्रस्ताव मजूर करण्यात आले. सध्या सिडकोच्या ताब्यातील विविध विषयांसाठी आरक्षित भूखंड पनवेल महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत केले जात आहेत, त्यातील सामाजिक सुविधा व सांस्कृतिक यात आले. विषयांसाठी आरक्षित असे काही भूखंड पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यातील चार भुखंडापैकी कळंबोली येथे मराठा समाजाच्या मुलांसाठी छत्रपती शाहू महाराज वस्तीगृह, नवीन पनवेल येथे माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींसाठी वस्तीगृह कामोठे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिकभवन उभारणेया विषयांच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या विषयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या भावना तीव्र असताना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावनांचा आदर केला गेला व एक स्तुत्य उपक्रम राबवून या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर महापालिकांना एक आदर्श घालून देण्याचे काम केले गेले असल्याचे विक्रांत पाटील म्हणाले.
| पनवेल महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर... मराठा समाजाच्या मुलासाठी वसतीगृह उभारणार