ऐरोली (प्रतिनिधी)- समाजसेविका प्रतिक्षा वासुदेव पाटील व नवी मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण मंडळ सदस्य तथा भाजपचे राबाडेतील ज्येष्ठ पदाधिकारी वासुदेव पाटील यांच्यावतीने बुधवार दि.19 फेबु्रवारी रोजी राबाडेतील हिरा काळू नारणकर शाळा क्र.47 येथील भव्य पटांगणावर महिलांसाठी भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभ आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐरोलीचे आ. गणेश नाईक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा.संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी आ.संदीप नाईक, विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील, माजी उपमहापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवानेते वैभव नाईक, अनंत सुतार, सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी नगरसेविका माधुरीताई सुतार आदींची उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत व भजनी मंडळांचा सत्कार समारंभ करण्यात येईल. यानिमित्त मनोरंजनासाठी परशुराम कोळी यांचा आर्केस्टा ठेवण्यात आला असून महिलांसाठी आकर्षक खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. समाजसेविका प्रतिक्षा व वासुदेव पाटील यांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या हळदीकुंकू समारंभाप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने लाभत असते ही परंपरा यावेळीही अनुभवण्यास मिळणार आहे.
राबाडेत उद्या महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभ