कर्नाळा बँक कथित घोटाळा प्रकरण... माजी आ.विवेक पाटील यांच्यासह 76 जणांवर गुन्हा दाखल


पनवेल (प्रतिनिधी) - कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ.विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळांतील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये विवेक पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील यांचाही समावेश आहे. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत न दिल्याचा तसेच सदर बँकेत घोटाळा झाला असल्याचा  आरोप  आहे. 
बोगस कागदपत्रांच्रा आधारे जवळपास 512.50 कोटींचे कर्ज काढल्राप्रकरणी सहकार खात्राच्रा तक्रारीवरून सोमवारी (दि.17 फेब्रुवारी) रात्री फिर्रादी म्हणून जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश गोपिनाथ तुपे रांनी केलेल्रा तक्रारीनुसार गुन्हा रजि.नं. 78/2020 भादवि कलम 409,417,420,463, 465, 467, 468, 471, 477,201,120(ब),34सह सहकारी संस्था अधिनिरम 1961 कलम. 147, सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधांचे संरक्षण अधिनिरम, 199 चे कलम. 3 अन्वरे गुन्हा दाखल करण्रात आला असल्याची माहिती देण्यात आली
कर्नाळा बँकेचे अध्रक्ष विवेक पाटील, उपाध्रक्ष व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्र कार्रकारी अधिकारी रांनी बँकेचे निरमांचे उल्लंघन करुन, आपआपसात संगणमत करुन, गैरव्रवहार करण्राच्रा हेतुने कागदपत्रामध्रे फेरफार केला, कागदपत्रे नष्ट केली, बनावट कागदपत्रे तरार केली. त्राचा सदर कर्ज प्रकरणात वापर करुन बँकेचे सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणुक करुन ठेवीदारांनी विश्‍वासाने ठेवलेल्रा 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपरे रकमेच्रा ठेवींचा अपहार केला व बॅकेची आर्थिक स्थिती डबघाईस आणल्याचा आरोप असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्रात आल्राचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक, वर्ग - 1 सहकारी संस्था रायगड यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच सन 2008 ते आतापर्रंत विवेक पाटील रांनी बोगस कर्ज प्रकरणातून 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपरे अपहार केल्राचे लेखा परिक्षणाच्रा अहवालातून उघड झाले असून हा मुद्देमाल अद्याप मिळाला नसल्राचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती देण्यात आली. सदरच्रा गुन्ह्याचा तपास तपास पोलीस निरीक्षण (प्रशासन) शत्रुघ्न माळी रांच्राकडे सोपविण्रात आला आहे. 
बोगस कागदपत्रांच्रा आधारे जवळपास 512.50 कोटी कर्ज काढल्राचा ठपका सहकार खात्राने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे. तर गेल्रा सहा महिन्रांपासून कर्नाळा बँकेच्रा हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्राचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ठेवीदार आणि खातेदारांना राप्रकरणी न्रार मिळावा रासाठी खातेदारांनी आ.प्रशांत ठाकूर आणि आ.महेश बालदी रांच्राकडे धाव घेतली असता प्रसिद्ध लेखापाल किरीट सोमैय्रा रांच्रा मार्गदर्शनाखाली रा दोन्ही लोकप्रतिनिधींनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्रा माध्रमातून सहकार खाते व आरबीआर रांच्राकडे सातत्रपूर्ण पाठपुरावा केला होता. वर्ष 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने सदर बँकेची तपासणी केली असता, त्यात गंभीर आक्षेप निदर्शनास आल्याने आरबीआयने सहकार आयुक्तांना विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते.
सहकार खात्राबरोबरच पाठपुरावा करीत असताना मागील महिन्रात आरबीआरवर तसेच नुकताच पनवेलमध्रे भव्र मोर्चा काढण्रात आला होता. राची दखल घेत सहकार खात्राच्रा तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्रक्ष माजी आ.विवेक पाटील आणि बँकेच्रा 14 संचालकांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्रात गुन्हा दाखल करण्रात आला आहे.