आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त शिरवणे शाळेत मातृभाषेचा जागर


नवी मुंबई (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महा पालिका शाळा क्रमांक १५, शिरवणे शाळेत मातृभाषेचा जागर अशा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी वक्त्यांची तर शिक्षकांनी श्रोत्यांची भूमिका बजाविली. यावेळी बंगाली, भोजपुरी, पंजाबी, हरियाणवी, मराठी, उर्दू, गुजराथी, मारवाडी, आगरी, मालवणी, अहिराणी, बंजारी, वडार, खानदेशी, कोळी, कोकणी, मराठवाडी, नागपुरी, अशा मातृभाषेतून व बोलीभाषेतून विद्यार्थ्यांनी गप्पा, गाणी, म्हणी, नाटके, विनोद सादर केले. राहुल गावडे व ओमकार मुद्दे यांनी अनुक्रमे कोल्हापुरी व वडार बोलीभाषेत सादर केलेली एक पात्री नाटके विशेष उल्लेखनीय ठरली. कलाशिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांनी या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करुन सादर केलेल्या आमी शाताव जावाचू तवा जेवढी सहज व लवकर स्पष्ट होते विद्यार्थ्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण या आगरी बोलीतील कवितेने तेवढी स्पष्टता इतर कोणत्याही भाषेत घेण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. नसते. म्हणूनच मातृभाषा हेच सुनिल मुकादम यांच्या मातृभाषेचा जागर या परिसंवादात शिक्षणाचे सर्वात चांगले माध्यम मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला सर्वच विद्यार्थ्यांनी आपली मते असल्याचे मत शिक्षिका प्रणाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्भयपणे व्यक्त केली. मातृभाषेतून पिंपळे यांनी आपल्या बोलीभाषेतील शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिकताना कोणतीही संकल्पना भाषणातून व्यक्त केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.