प्रा. एन.डी. पाटील यांना 'स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार' जाहीर


पनवेल (प्रतिनिधी) - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्व.स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी काल खांदा कॉलनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथमच देण्यात येणा-या या पुरस्काराने रयत थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे माजी खा. रामशेठ ठाकूर म्हणाले.