नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईत महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. देवाधिदेव आणि तिन्ही लोकांचे स्वामी अशी ख्याती असलेल्या महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. 'महाशिवरात्री'चा हा उत्सव नवी मुंबईतील विविध शंकर मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवमंदिरे आकर्षक फुलांनी सजलेली व विद्युत रोषणाईने नाहून निघाली असल्याचे दृश्ये दिसत होते. पहाटे पासून भाविक भक्तांनी शिव मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या नवी मुंबईतील वाशी से-येथील जागृतेश्वर शिवमंदिरकोपरखैरण्यातील चिक्नेश्वर, पावणे येथील पावणेश्वर, तसेच ऐरोलीरबाळेगाव, गोठीवली, घणसोलीसानपाडा, नेरुळ, तुर्भे व इतर विविध ठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविक भक्तांनी शिवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी हर हर महादेव... बम बम भोले... अशा प्रकारे शिवभक्तांनी केल्या जाणा-या गजरानी नवी मुंबई परिसर दुमदुमला होता. विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महादेव यांना प्रिय असलेल्या बेलाची पाने, धोतऱ्याचे फुल अर्पण करणे व दुग्ध अभिषेक करण्यावर भाविकांकडून भर दिला जात होता. त्यामुळे बेलाच्या पानांची मागणी वाढली होतीमहाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होतेमहाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फूले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.असेच काहीसे चित्र महाशिवरात्री निमित्त शहरात काल पाहावयास मिळाले.
महाशिवरात्री उत्सव.... 'हर हर महादेव'च्या गजराने दुमदुमली शिवमंदिरे