महापेतील महापालिका शाळेतील प्रकार | आरोपी शिक्षकास पोलिस कोठडी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघा नराधमांनी वाट चुकलेल्या व मदतीची याचना करणा-या महिलेवर बलात्कार करण्याची घटना ताजी असतानाच महापे येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना संगणक शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाने शाळेतील इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या १४ अल्पवयीन विद्यार्थिनींचा संगणक वर्गाच्या दरम्यान विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भादंवि कलम ३५४ सह पोस्को कलमानव्ये गुन्हा दाखल करून संगणक शिक्षकास बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शिक्षकास पोलिसांनी कोर्टापुढे हजर केले असता त्यास २ मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये लॅब्सची सोय आहे अश्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी सीएसआर अंतर्गत एका नामांकित व्यावसायिक संस्थेकडून संगणक साहित्यासह पुरविले जातात. त्यापैकीच महापे येथील सदर शाळेत यातील आरोपीची संगणक प्रशिक्षणासाठी निवड केली होती. मात्र, संगणक शिकविण्याच्या नावाखाली तो मुलींशी लगट करून अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुलींनी शाळेतील शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेसदरचे हे प्रकरण तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सदर आरोपी शिक्षकाने शाळेतील इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या सुमारे १४ हुन अधिक मुलींबाबत हा निंदनीय प्रकार केला असल्याचे समजतेत्यादृष्टीने पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
box
या प्रकरणातील ३१ वर्षीय आरोपी संगणक शिक्षकाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी आयपीसी ३५४ आणि पोस्को कायदा कलमानवये गुन्हा दखल करून त्यास त्याच दिवशी अटक केली आहे. अधिक चौकशी सुरु आहे. - सचिन राणे, वपोनि तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे