नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या । कोकण भवन शाखेतर्फे स्वागत करण्यात येऊन काल शासकीय कामाप्रती वचनबध्द राहण्याची आधिकाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी कोकण विभाग राजपत्रित अधिकारी महासंघ समन्वय समितीचे अध्यक्ष सिताराम काळे, राज्यकर वस्तू व सेवाकर विभाग रायगडचे सहआयुक्त प्रदिप कडू, कोकण विभाग उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, वस्तू व सेवाकर राज्यकर विभाग उपायुक्त विलास नागरगोजे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संघटक सचिव कमलेश नागरे, कोकण विभाग महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या महिला उपाध्यक्ष अश्विनी धुमाळेचौधरी तसेच कोकण भवनमधील राजपत्रित अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
box
जनतेचे सेवक या नात्याने एका सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी महासंघाने अधिक कामाची हमी दिली आहे. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, गतिमानतेची, सौजन्याची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्यसंस्कृतीला वेगळी झळाळी देणारी असल्याने महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले वचन आहे. या वचनाचे पाविन्य राखण्यासाठी अधिकारी वचनबध्द आहेत अशी शपथ घेतली.