बेलापूर गावातील सिटी सर्वेक्षण पुन्हा होणार सुरु


नवी मुंबई (प्रतिनिधी) -  बेलापूर गावातील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरु करण्याबाबत आ.मंदा म्हात्रे यांनी  सिडकोचे व्रवस्थापकीर संचालक  लोकेश चंद्रा यांची काल भेट घेतली. त्यावेळी रेत्रा 8 दिवसांत बेलापूर गावातील थांबविण्रात आलेले विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात करणार असल्राचे लोकेश चंद्रा रांनी बैठकीत सूचित केले असल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली. सर्वेक्षण झालेल्रा ग्रामस्थांच्रा घरांना प्रॉपर्टी दिल्रास ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे निरमित होण्रास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.  
महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व प्रकल्पग्रस्त नेते पंढरीनाथ  पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती कार्राध्रक्ष डॉ. राजेश पाटील, भाजपा महामंत्री विजर घाटे, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, ज्रेष्ठ समाजसेवक महादेव पाटील, पांडुरंग दत्तात्रर कोळी, दिलीप वैद्य, संदेश पाटील तसेच सिडकोचे संबंधित अधिकारी व इतर प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 
 नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे निरमित व्हावीत, सदर घरांचे प्रॉपर्टी कार्ड त्रांना मिळावे, राकरिता  शासन दरबारी सातत्राने पाठपुरावा करीत असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी व सिडको कार्रालराकडून शिदोरे अँण्ड शिदोरे कंपनी मार्फत बेलापूर गावातील विस्तारित गावठाण घरांचे सिटी सर्वेक्षण अर्धे अधिक पूर्णही झाले आहे. परंतु काही कारणास्तव सदर सिटी सर्वेक्षण थांबविण्रात आले होते, ते काम आता पुन्हा सुरु होणार असल्याचे आ. मंदा म्हात्रे म्हणाल्या.