नवी मुंबई (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने काल महापालिका प्रशासनास पत्रान्वये नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार दि. ३१ जानेवारी २०२० हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी दि.९ मार्च २०२० रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि.९ मार्च २०२० ते १६ मार्च २०२० हा कालावधी जाहीर करण्यात आला असून या हरकती व सूचना विहित नमुन्यात नवी मुंबई एल्गार! महापालिका मुख्यालय निवडणूक विभाग आणि संबंधित विभाग कार्यालय याठिकाणी दाखल करता येतील. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी महापालिका मुख्यालय आणि संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. २३ मार्च २०२० रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी तसेच दि.२४ मार्च २०२० रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमाची नोंद संबंधितांनी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. तुभे डम्पिंग ग्राऊडवर आग या आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाचे स्टेशन इन्चार्ज एकनाथ पवार यांनी दिली. मात्र आगीमुळे यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे वातावरण काहीकाळ निर्माण होऊन त्याचा आसपासच्या रहिवाश्याना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याचे सांगण्यात येते. वाशी अग्निशमन दलाच्या मल्टि पर्पज फायर इंजिन व वॉटर टँकरच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली. संपूर्ण नवी मुंबई शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा तुर्भे एमआयडीसीतील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या उष्णतेत वाढ होऊ लागली असल्याने डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे घर्षण होऊन ही आग लागली असावी अशी शक्यता वाशी अग्निशमन दलाचे स्टेशन इन्चार्ज एकनाथ पवार यांनी याविषयी बोलताना वर्तविली. घटनास्थळी वाशी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन एस. आर. पाटील यांच्यासह दोन फायरमन हजर होते.
box
अंतिम प्रभाग निहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून दि. २६ मार्च २०२० रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशे नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.