नेरुळ (प्रतिनिधी) - डी वाय पाटील टी-२० चषक क्रिकेट स्पर्धा दि. २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान, नेरुळ येथील डीवाय पाटील स्टेडियम व विद्यापीठ मैदानावर आयोजित करण्यात आली असून यंदाचे स्पर्धेचा १६ वा टप्पा आहे. काल डॉ.डी.वाय. पाटील क्रीडा समूह आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्याहस्ते उदघाट्न होऊन डी.वाय. पाटील टी टेंटी कप क्रिकेट स्पर्धस सुरुवात झाली. एकूण १६ संघादरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून एकूण ३१ सामने या मैदानांवर होणार आहेत. त्यामुळे किकेट प्रेमींना विविध संघांमध्ये होणान्या चुरशीच्या सामन्यांचा आस्वाद घेता येणार आहे. __या स्पर्धेत ४ आणि ५ मार्च रोजी उपांत्यपूर्व सामने खेळले जाणार असून ६ मार्च रोजी उपांत्य आणि अंतिम सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण २४० खेळाडूंचा सहभाग असणार असून प्रामुख्याने शिखर धवन, हार्दिक पांड्या, भूवनेश्वर कुमार, अनमोलप्रीत सिंग, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, संजू सॅम्सन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, दिव्यांश सक्सेना, दिनेश कार्तिक, मनदिप सिंग, आदित्य तरे, सिद्धेश लाड असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश लाभणार असून डी.वाय. पाटील ए, डी.वाय. पाटील बी, मुंबई कस्टम्स, आरबीआय, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, बीपीसीएल, एअर इंडिया, इनकम टॅक्स, रिलायन्स-१, जैन इरिगेशन, इंडियन ऑइल, इंडियन नेव्ही, सीएजी, बँक ऑफ बरोडा व कॅनरा बँक अश्या १६ टीम सहभागी होणार आहेत. तर ६ मार्च रोजी प्रकाशझोत सामना होणार आहे.