उपजिल्हा रुग्णालयात अखेर प्रसूती तज्ज्ञ रुजू


पनवेल (प्रतिनिधी) - बहुचर्चित पनवेल उपजिल्हा रूग्णालयात बाळंतपणासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने विशेषतः सिझरीनसाठी अन्यत्र रूग्णाला पाठवावे लागत होतेमात्र आता या सेवेत डॉ. श्वेता राठोड रूजू झाल्याने हा प्रश्न निकालात निघाल्याची चर्चा असून गर्भवती महिलाना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेपनवेल उपजिल्हा रूग्णालयात प्रसूती डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिला यांना प्रसूतीच्या वेळी अडचणींचा नसल्याने अवघडलेल्या सामना करावा लागत होता. परिस्थितीत रूग्णांना दुसरीकडे सिझरीन करण्यासाठी डॉक्टर पाठवावे लागत होते. त्यामुळे १२० खाटांच्या अलिशान आणि अत्याधुनिक ते चा साज दिलेल्या उपजिल्हा रूग्णालयाबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांनी १२ फेब्रुवारीला डॉ. श्वेता राठोड यांची प्रसूती तज्ञ म्हणून नियुक्ती केली असून त्या उपजिल्हा रूग्णालयाच्या सेवेत दोन दिवसांपूर्वी रूजू झाल्या आहेत. तर अजून एक डॉक्टर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.