मुंबई (प्रतिनिधी) - वाशी, ऐरोलीसह मुंबई-पुणे द्रतगती महामार्ग, ठाणे, दहीसर येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एमएसआरडीसी) राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता असावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची काल मत्रालयात बैठक झाली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के आदी उपस्थित होते. यावेळी महामंडळामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा ना. एकनाथ शिंदे यांनी घेतला. रस्ते, पूल, उड्डाणपुल तयार करताना त्यांच्या सौंदर्यावर अधिक भर द्यावा. रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावावीत, शोभीवंत कुंड्या ठेवून त्यांची निगा राखावी. राज्यभरात महामंडळाच्या माध्यमातून उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत त्यांचा आढावा घेण्यात यावा. या पुलांची रंगरंगोटी, सौंदर्गीकरणावर भर देताना त्यात एकसुत्रता असावी. यासाठी अधिकारी नेमून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डे पडणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे सार्वजनिक बाधकाम मत्र्यानी सांगितले. उड्डाणपुलाखाली डेब्रिज, सामान राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पुलांखालचा भाग स्वच्छ आणि मोकळा राहावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रस्त्यांच्या कामांमुळे राज्याच्या विकासात भर पडत असून नागरिकांची मोठी सोय होत आहे. मात्र टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून येतातनागरिकांना टोल देण्यासाठी तास-तासभर अडकून पडण्याची गरज नसल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलेकल्याण-शीळफाटा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवर माती. डेबीज काढन टाका व रस्ते स्वच्छ आणि संढर करारस्त्यांच्या दुभाजकांवर असेल्या कुंड्यांना रंगरंगोटी करा तसेच पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही अशा सूचनाही ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
वाशी, ऐरोलीसह टोलनाक्यांवरील लेनची संख्या वाढवा-नगरविकास मंत्री