शाळकरी मुलांनी गिरविले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


वाशी (प्रतिनिधी)-आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? विशेष करून वैद्यकीय आणीबाणी व आपत्ती व्यवस्थापन शिक्षण यांचे महत्त्व यायाबाबत शाळकरी विध्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याहेतूने हार्ट फौडेशनने जागृती मोहिमेअंतर्गत, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्या सहयोगाने वैद्यकीय आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापनातील पहिले काही मिनिटे या नोंदवत मुंबई महान यांनी सामाविषयी विषयी एका जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन काल वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महापालिका हद्दीतील विविध शाळांच्या शाळकरी मुलांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले, आपत्ती व्यवस्थापन व आणीबाणी याविषयी जाणून घेणे, हा महत्त्वाचा पैलू आहे आणि त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला फायदा होणार आहे. आम्ही हा उपक्रम नवी मुंबईत सर्वत्र राबवणार आहोत आणि लोकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तेजन देणार असल्याचे सांगितले. पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत डी. रसाळ म्हणाले , लोकांना आपत्ती व्यवस्थापन व आणीबाणी याविषयी माहिती देणे, हा अतिशय नावीन्यपूर्ण कार्यक्रम असून लोकांनी सहभागी व्हावे आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या विषयांबद्दल अधिकाधिक जागृती करावी असे आवाहन केले. यावेळी अपोलो हॉस्पिटल्सचे प्रमुख व सीओओ संतोष मराठे, हार्ट फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. जयकर यांचेही मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमादरम्यान, या उपक्रमासाठी शालेय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला