जलतरणपटू तन्मय सुतारची कामगिरी


कोपरखैरण्यातील रहिवाशी असलेला जलतरणपटू तन्मय महेंद्र सुतार याने एलिफंटा ते बेलापूर जेटी हे १२.४१ किलो मीटरचे सागरी अंतर ३ तास २० मि. ४ सेकंदात पूर्ण करण्याची कामगिरी रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी केली आहे. या कामगिरीबाबत तन्मय याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.