ना.रामदास आठवले यांना डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट


मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय समाजसेवेमुळे डी.वाय. पाटील विद्यापिठातर्फे डी. लिट. या पदवीने गौरव करण्यात आला. नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला.
या भव्य सोहळ्यात रामदास आठवले यांना डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लीट) या पदवीने गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. डी. लिट पदवी प्रदान सोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवलेसह संपूर्ण आठवले कुटुंब उपस्थित होते.
रामदास आठवले सध्या राज्यसभेचे खासदार आहेत तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. पंढरपूर येथील लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून रामदास आठवले निवडून आले होते.