नवी मुंबई महापौर चषक निमंत्रित


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापौर चषक निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला असून ३ दिवसीय पाचव्या स्पर्धेची आज सांगता होत आहे. कोपरखैरणे येथील .फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणात सुरु असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. गणेश नाईक यांनी, नवी मुंबईच्या विकासाची गती वाढती असून नागरी सुविधांप्रमाणेच लोक कल्याणकारी योजना व उपक्र मांमध्ये ही नवी मुंबई महापालिका आघाडीवर असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत काडा व सास्कतिक उपक्रमांच्या माध्यमातून महापालिका गुणवंत खेळाडू व कलावंत निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महापौर जयवंत सुतारक्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका लता मढवीमहाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच स्पधा निरादाक असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक .पवन पाटील व सह सचिव गंधाली पालांडे, ठाणे जिल्हा खोखो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक राजन देवरुखकर.फ.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य थळे, पंच प्रमुख विरेंद्र भुवड, तांत्रिक समिती प्रमुख सुरेंद्र विश्वकर्मा, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे, मयुर पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात यजमान नवी मुंबई महापालिकच्या सवाल तुषर महापालिकेच्या संघासह मुंबई महापालिका, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, साईकृष्ण इलेक्ट्रीक, महाराष्ट्र महावितरण कंपनी व मध्य रेल्वे अशा संघांनी सहभाग घेतला आहे. तर व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय, राजर्षी शाहू महाराज महापालिका विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय, विहंग अॅकॅडमी, शिवभक्त विद्यामंदीर, ग्रिफीन जिमखाना, नमुंमपा शाळा क्र.४१ व फादर अॅग्नेल या संघांनी सहभाग घेतला आहेत. याप्रसंगी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या कविता घाणेकर आणि हर्षद हातनकर या दोन राष्ट्रीय खो-खो पट्टचा विशेष सन्मान करण्यात आला. चौदा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेली खो-खो पट्ट प्रणाली मगर हिच्यासह सर्व खेळाडूंनी सामुहिक शपथ ग्रहण केली.