ठेकेदारासह सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल
सानपाडा (वार्ताहर) सानपाडा से - १२ येथील जयपुरीयार स्कूलच्या चौथ्या मजल्यावर काँलम भरण्याचे काम करत असताना लिफ्टवरून खाली पडून एका ४१ वर्षीय बिगारी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. उदयराज बद्रीशकुमार मिश्रा असे या मृत बिगारी कामगारांचे नाव असून तो मध्य प्रदेशयेथील रहिवाशी आहे. याप्रकरणी सिराजुल मीर । नावाच्या सिव्हील काँन्ट्रॅक्टरने सानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काँन्ट्र क्टर मधुसूदन व सुपरवाझर अश्या दोघा जणांविरोधात भादंवि कलम ३०४ अ अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हकीकत अशी कि, सानपाडा से-१२ प्लॉट नं.१२ येथील जयपुरीयार स्कूल या शाळेच्या चौथ्या व पाचव्या स्लबचे काम काँन्ट्र क्टर मधुसूदन यांनी हाती घेतले आहे. सदर शाळेच्या दक्षिण बाजूस कामासाठी लोखंडी लिफ्ट लावलेली आहे. सदरची लिफ्टच्या साहाय्याने कामगार खालीवर ये-जा करत असतात व कामगार देखील त्याच लिफ्टच्या मदतीने बांधकाम सामानाची चढ उतार करतात. उतार करतात. त्यानुसार दिनांक फेब्रुवारी रोजी सदर ठिकाणी नेरूळ नाका येथून कामासाठी आलेला उदयराज बद्रीशकुमार मिश्रा हा बिगारी कामगार जयपुरीयार स्कूलच्या चौथ्या मजल्यावर काँलम भरण्याचे काम करत असताना अचानक तो लिफ्टवरून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सदरची ही बाब तेथील इतर कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी मिश्रा याला रिक्षाने उपचारासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिगारी कामगार मिश्रा यास मृत घोषित केले. याप्रकरणी सिव्हील काँन्ट्रैक्टर सिराजुल मीर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी काँन्ट्र क्टर मधुसूदन व सुपरवाझर या दोघांनी कामगारांना काम करताना त्यांच्या जिवीतास धोका पोहचू नये यासाठी कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे उपाय योजना न पुरविता बिगारी कामगार मिश्रा यास काम करण्यास लावल्यामुळे त्याचा या घटनेत मृत्यू झाल्याच्या कारणावरून पोलिसांनी काँन्ट्रक्टर मधुसूदन व सुपरवाझर अश्या दोघाना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.