फोर्टी प्लसमुळे आरोग्य संवर्धनाचा संदेश -आ.गणेश नाईक


नवी मुंबई (प्रतिनिधी) वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असताना क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून मास्टर प्रदीप पाटील यांनी नवी मुंबईत रूजवलेले फोर्टी प्लस क्रिकेटचे बीज आता संपूर्ण राज्यात लोकप्रिय होत आहे. तसेच या माध्यमातून नवी मुंबईच्या नावलौकीकीत भर पडली असून यामधून क्रीडा संस्कृती विकसित होण्यासोबतच आरोग्य संवर्धनाचा संदेशही प्रसारित होत असल्याचे प्रतिपादन आ. गणेश नाईक यांनी येथे केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सेक्टर १५, घणसोली येथील फोर्टी प्लस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 'नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धेचे उद्घाटन आगणेश नाईक यांच्या हस्ते काल झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉजयाजी नाथ, ड प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, नगरसेवक लिलाधर नाईक व अनिता मानवतकर, नवी मुंबई फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव लिलाधर पाटील, खजिनदार नरेश गौरी, कार्यकारणी सदस्य विकास मोकल, क्रीडा अधिकारी रेखप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुढील वर्षीच्या फोर्टी प्लस स्पर्धा प्रकाशझोतात खेळविण्याचा मनोदय महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. तर क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी फोर्टी प्लस क्रिकेट ही संकल्पनाच अत्यंत आगळीवेगळी असल्याने आरोग्याविषयी जागरूक असणाया सर्वांना ती लगेच भावते आणि त्यामुळेच ती अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याची भावना व्यक्त केली. ३ दिवस चालणाऱ्या या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये ५० संघ सहभागी सहभागी झाले आहेत. नवी मुंबईच्या ग्रामीण भागातील ३२ व शहरी भागातील १८ संघ सहभागी _ झाले असून उद्या,दि. २३ रोजी सायं. ५.३० वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.