नवीन पनवेलकरांची मागणी महानगर गॅस पाईपलाईन सेवा लवकर सुरू करा

पनवेल (प्रतिनिधी) - नवीन पनवेल परिसरातील रहिवाशांसाठी महानगर गॅस पाईपलाईन सेवा लवकरात लवकर सुरू करावी तसेच ही पाईपलाईन टाकण्यासाठी नवीन पनवेल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून ते रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुका संपर्क संघटक पनवेल विधानसभा प्रतिभा सावंत यांनी महानगर गॅस एजन्सी अधिकाऱ्यांकडे केली आहे. नवीन पनवेल या ठिकाणी महानगर गॅस एजन्सीची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदर काम वेगाने करून येथील रहिवाशांना गॅस सेवा लवकरात लवकर सुरू करावी. तसेच हे पाईप लाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. ते रस्ते काम पूर्ण झाल्यावर पुर्व स्थितीत करून । ठेवावे अशी मागणी सुद्धा यावेळी शिबिराचे प्रतिभा सावंत यांनी निवेदनात केली असून याबाबत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन महानगर गॅस एजन्सी अधिकाऱ्यांकडून दिले असल्याचे सांगण्यात आले.