पनवेल (प्रतिनिधी)- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्व.जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा उद्या (दि.२९) सकाळी ११ वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्या अनुषंगाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खा.रामशेठ ठाकूर यांनी काल या तयारीची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, प्राचार्य वसंत ब-हाटे उपस्थित होते. स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथमच देण्यात येणा-या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खा.रामशेठ ठाकूर स्वतः विशेष लक्ष देत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आ.प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, यांच्यासह संचालक मंडळ व सहकारी विशेष मेहनत घेत आहेत. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्व.जनार्दन भगत यांच्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी