पनवेल (प्रतिनिधी)- येत्या नवीन मराठी वर्षात म्हणजेच गुढीपाडवा दिनी (दि.२५ मार्च) किंवा १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरुन पनवेल - अंधेरी- गोरेगांव अशी थेट रेल्वेसेवा सुरु होण्याची चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनाने अंधेरी-बेलापूर अशी लोकल रेल्वे सेवा हार्बर मार्गे चालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवी मुंबईपरिसरातील प्रवासी बांधवांना पश्चिम रेल्वेशी संपर्क साधणे शक्य झाले. दरम्यान प्रवासी संघ पनवेल या संघटनेमार्फत सदर लोकल सेवेचा पनवेलपर्यंत विस्तार करावा, अशी प्रवाशांच्या आग्रही मागणी केली जात आहे. यासाठी प्रशासनाकडेसन २००१ पासून सतत पाठपुरावा चालू होता, त्याला सन २००७ मध्ये रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदिल मिळालाव प्रवासी संघाच्या दप्तरी लेखी पत्र आले आणि दि.२.१०.२००७ रोजी पनवेल शहर वासीय व ग्रामीण भागातील प्रवाशांच्या पश्चिम रेल्वे विभागाचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर पुनश्च प्रवासी बांधवांच्या मागणीनुसार वरेल प्रशासनाच्या चर्चेद्वारा ही रेल सेवा गोरेगांव - बोरीवलीपर्यंत नेण्याचे नक्की ठरले. त्यानुसार २०१४ डिसेंबर अखेर काम पूर्ण होऊन रेल सेवा गोरेगांव पर्यंत जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु काही तांत्रीक व प्रशासकीय अडचणीमुळे सतत कामात अडथळे निर्माण होत होते. आता या अडथळयांच्या शर्यतीवर मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व एम.आर.व्ही.सी प्रशासन कार्यालयाने मात करून पनवेल व मुंबई प्रवासी बांधवांचे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या कार्याची पूर्तता सन २०२० मध्ये नवीन मराठी वर्षात गुढीपाडवा २५ मार्च २०२० किंवा १ एप्रिल २०२० मध्ये पनवेल रेल्वे स्थानकावरून पहिल्या पनवेलगोरेगांव लोकलला हिरवा बावटा दाखवून रेल्वे प्रशासनाकडून पनवेलकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तिकुमार दवे, कार्यवाह व उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट यांनी दिली. सद्यस्थितीत पनवेल-अंधेरी एकूण अप-डाऊन अशा १८ फेन्या आहेत, त्या तशाच चालू ठेवून पनवेल-वडाळा ह्या रेल्वे सेवा गोरेगांवपर्यंत वाढविण्यास रेल्वे प्रशासनाकडे चर्चेद्वारे लेखी मागणी करण्यात आली आहे. याची पुर्तता हार्बर व ट्रन्स हार्बर लाईनचे नवीन वेळापत्रक १ एप्रिल २०२० पासून अंमलात येणार असल्याचे डॉ.भक्तिकुमार दवे यांनी सांगितले.
लवकरच हार्बर मार्गे पनवेलहून थेट गोरेगावपर्यंत रेल्वे सेवा