झोपडपट्टीधारकाना नागरी सुविधा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण तुर्भे (प्रतिनिधी) - तुर्भे मागणी या उपोषण आंदोलना


तुर्भे (प्रतिनिधी) - तुर्भे विभागातील कृष्णा स्टील झोपडपट्टी धारकाना मागील अनेक वर्षापासून मुलभुत सुविधा पुरविण्यात येत नसल्याने याबाबत महापालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस तुर्भे तालुका कमिटीतर्फे तुर्भे ड विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. कृष्णा स्टील झोपडपट्टीधारकाना पिण्याचे पाणी, लाईट, शौचालय तात्काळ पुरविण्यात याव्यात अशी मागणी या उपोषण आंदोलना दरम्यान केली गेली. त्याबाबत उपोषणकर्त्यांना सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी लवकरच हया विभागातील नागरिकांना पाणीलाईट, शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषण आंदोलनात तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष शंकरराव पडूळकर, जिल्हा सरचिटणीस राजेन्द्र इंगळे, विभागीय अध्यक्ष फिरोज शेख, वॉर्ड अध्यक्षा मालनताई मुजावर, उपाध्यक्ष वॉर्ड जहागिर शेख आदींनी उपस्थित राहून सहभाग घेतला होता.