सानपाडा तुर्भे (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागा। कार्यालयामार्फत काल मोठ्या पोलीस बंदोबस्तात सानपाडा परिसरातील एकूण १७५ झोपड्यांवर तोडक कारवाई करून त्या हटविण्यात आल्या. शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. त्या अनुषंगाने सानपाडा परिसरातील सेक्टर-१८ येथील केशर सॉलिटरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ५० झोपड्या, सानपाडा सेक्टर-१५ येथील अभियंता बिल्डिंग समोरील ३५ झोपड्या, सेक्टर १६ शिवदर्शन सोसायटी समोरील २५ झोपड्या, सेक्टर २० येथील मलनिस्सारण केंद्र लगतच्या ४५ झोपड्या व सेक्टर-१७ वडार भवन शेजारील २० झोपड्या अश्या एकूण १७५ झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्या. तुर्भे विभाग कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांनी कडक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविली.
सानपाडा परिसरातील १७५ झोपड्यांवर तोडक कारवाई