मुंबई (प्रतिनिधी) - राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहेसध्या २०२० मध्ये उरलेल्या ३०७ दिवसांपैकी १०२ सुट्ट्या मिळणार असल्याने त्यांची चांगलीच चंगळ पाहायला मिळणार आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त शनिवारच्या एकूण ४४ सुट्या जास्तीच्या मिळत आहेत. त्यात कर्मचा-यांना उरलेल्या सात महिन्यात सलग सुट्या घेण्याची संधी ११ वेळा मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात कर्मचा-यांच्या जागा वर्षभरात शेकड्याहन अधिक दिवस रिक्तच दिसणार आहेत. सरकारच्या निर्णयात या कर्मचाऱ्यांना ४५ मिनीटांचे अतिरिक्त काम देण्यात आले असले तरी या वर्षातील उरलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या २०५ दिवसात ते केवळ ९,२२५ मिनीटे अधिक होतेमात्र ते वाढलेल्या सुट्यांच्या तुलनेत अतिशय नगण्य अशा स्वरूपाचे आहेत. सरकारी कार्यालयामध्ये सलग सुट्ट्यांचे चित्र मार्च, एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहेसहा महिन्यांमध्ये सरकारी कर्मचारी शनिवारला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे सलग तीन अथवा चार दिवस कार्यालयात दिसणार नाहीत. मार्च महिन्यात ७ आणि ८ मार्चला शनिवाररविवारच्या सुट्ट्या असतील, तर ९ मार्चला रजा टाकल्यास १० मार्चला धुलीवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सलग चार दिवसाची सुट्टी मिळणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना गुढी पाडवा साजरा करण्यासाठी सुट्टी मिळू शकते, कारण २१, २२ मार्चला जोडून २३, २४ची रजा टाकून गुढी पाडव्यापर्यंत सुटीवर राहता येईल. दि.२ ते ६ एप्रिल दरम्यान रामनवमी ते महावीर जयंती असल्याने ४ दिवस सुट्ट्या घेता येतील तर १० एप्रिल ते १४ एप्रिल म्हणजे गुड फ्रायडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे चार दिवस सुट्ट्या घेता येतील. मे महिन्यात देखील कर्मचाऱ्यांना ते ३ मे आणि २३ ते २५ मे असे दोन वेळा तीन दिवस रजा घेण्याची संधी मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ३० तारखेला ईद आहे आणि त्या दिवशी शुक्रवार असल्याने सलग दिवसाची सुट्टी मिळू शकते तर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा महिना असल्याने १४ ते १६ आणि २८ ते ३० अशी सलग सुट्यांची संधी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. वर्षाच्या शेवटाला नाताळ हा सण देखील शुक्रवारी येत असल्याने २५ २७ किंवा त्यापेक्षा अधिक काळ रजेवर जाण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कार्यालये वर्षभर रिक्त असल्याचेच दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारी नोकरदारांची 'चांदी'... चालु वर्षात तब्बल १०२ दिवस सुट्ट्या