तुर्भेतील भाजपच्या चार नगरसेवकांचा राजीनामा


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे भागातील भाजपच्या चार सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत  शिवसेनेत प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. याच चार नगरसेवकांनी काल नवी मुंबई महापालिका आरुक्त अण्णासाहेब मिसाळ रांच्राकडे आपल्रा नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचेच स्पष्ट होते. राजीनामा देणार्‍रा नगरसेवकांमध्रे तुर्भेतील जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी (प्र.क्र.68), नगरसेविका राधा कुलकर्णी (प्र.क्र.73),  नगरसेविका संगिता वास्के (प्र.क्र.69), नगरसेविका मुद्रिका गवळी (प्र.क्र.70) रांचा समावेश आहे. महापालिका आरुक्तांकडे राजिनामा सुपूर्द करताना शिवसेनेचे नेते तथा महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. 
विधानसभा निवडणुकीदरम्रान राष्ट्रवादी सोडून आ. गणेश नाईक रांच्रासोबत सदर 4 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, भाजपात गेल्राने सदर नगरसेवकांचे कार्रकर्ते नाराज झाले होते. त्रामुळे रा चार नगरसेवकांचे नेतृत्व करणारे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी रांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत जाण्राचा निर्णर घेतला व काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे तसेच नवी मुंबईतील प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते.