शहरातील नागरिकांमध्ये पोटविकारांमध्ये वाढ... दषित पाण्याच्या बर्फामुळे गॅस्ट्रोएन्ट्रायसिस आजाराची लागण


नवी मुंबई (प्रतिनिधी) - वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून दूषित पाण्यामार्फत होणाऱ्या रोगांचे प्रमाण म्हणजेच पोटांच्या विकारांमध्ये गेल्या आठ दिवसात वाढ झाल्याचे निरीक्षण बोरीवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये पोटाचे विकार होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता व आपल्या पाणी पिण्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे रस्त्यावर तसेच कामाच्या ठिकाणी झटपट उपलब्ध असलेले पर्याय म्हणजेच लिंबूपाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर पेये घेतली जातात व हेच पोटांच्या विकाराचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्यात जास्त सर्वात जास्त त्रास देणारा आजार म्हणजे __गॅस्ट्रएन्ट्रयसिस यालाच स्टमक फ्लू असे म्हणतात. शहरातील नाक्यानाक्यावर उपल्बध असलेल्या लिंबू सरबत अथवा इतर फळांचा ज्यूस हलक्या दर्जाच्या पाण्याने बनविलेले असतात, तसेच हे पाणी आरोग्य खात्याने प्रमाणित केलेले नसते त्यामुळे या दूषित पाण्यामध्ये नोरोव्हायरस, रोटाव्हायरस एस्तव्हायरस यासारख्या डोळ्याला दिसणान्या विषाणूमुळे गॅस्ट्रोएन्ट्रायसिस आजाराची लागण होते, अशी माहिती अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.तन्वी शहा यांनी दिली. अनेक वेळा गरमीचा उतारा म्हणून अनेक नागरिक बर्फाचा गोळा, थंडगार सरबत -ज्यामध्ये बर्फाचा वापर केलेला असतोसेवन करतात, परंतु नकळतच यामध्ये बर्फामुळे कावीळ व टॉयफॉईड सारखे गंभीर आजार होत असतात. कारण बर्फसुद्धा आरोग्य खात्याने प्रमाणित केल्यामुळे अशा बर्फामध्ये अनेक विषाणूंचा पादुर्भाव झालेला असतोउन्हाळ्यामध्ये पोटदुखीसोबत ताप येणे व त्याबरोबर युरिनरी ट्रॅक इन्फेकशन म्हणजेच मुत्राशयासंबंधीत आजारांमध्ये वाढ होते, असे डॉ.तन्वी शहा यांचे म्हणणे