अलिकडच्या काळात वाहनांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर काही वाहनचालकांनी नियम - शिस्त न पाळता मनमानीपणे वाहने चालविणे यामुळेही अपघातांमध्ये वाढ होत असून अपघात घडू नयेत यासाठी सरकार, पोलिस आणि वाहतूक शाखा समन्वयाने प्रयत्न करीत असतात. यासाठी असलेले नियम, कायदे कडकपणे राबविले जात आहेत, नवे नियम-कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे आणि अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करतांनाच दंड, शिक्षा करण्यावर भर दिला जात आहे. याचे परिणामही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हेल्मेटचा वाढता वापर, लेन पाळणे, वेग मर्यादेचे पालन करणे यासह दारु पिऊन वाहन न चालविणे आदी नियम पाळण्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी शहरांप्रमाणेच मुख्य राज्य व राष्ट्रीय रस्त्यांवरही शिस्त पाळली जात असल्याचे दिसून येते, ही समाधानाची बाब. मात्र त्याचबरोबर नियम न पाळणाऱ्या चालकांवर कारवाई होत आहे. 'स्पीडगन' च्या रुपाने अतिवेगाची हौस असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू झाली आहे. नोव्हेंबरपासून इंटरसेप्टर' नावाच्या अत्याधुनिक वाहनाद्वारे चुकार वाहनचालकांवर कारवाईचे सत्र सुरू झाल्यानंतर आडव्यातिडव्या आणि कशाही गाड्या पळविण्याऱ्या चुकार वाहनचालकांना रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई केल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह मुंबई वगळता राज्यातील बहुतांश महामार्गांवर ९६ इंटरसेप्टर वाहनांच्या सहाय्याने १६ हजार ७०५ वाहनचालकांकडून सुमारे १७ कोटी रुपयांचा दंड आकारला असल्याची माहिती मिळते. अतिवेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणेमालवाहनात प्रवासी वाहतूक करणे, सिमल तोडणे आदी कारणांमुळे ही कारवाई झाली आहे. स्पीडगन ही वेगमर्यादा ओलांडणाऱ्या चालकांना टिपण्यासाठी अंतर्भूत आहे. इंटरसेप्टर वाहन एखाद्या सुरक्षित अंतरावर उभे केले जाते. एखादे वाहन भरधाव वेगाने जात असल्यास त्याचा अचूक वेग मोजण्याचे काम स्पीडगनकडून केले जातेसाधारण ३०० मीटर अंतरापर्यंत ही स्पीडगन वेगाचा मागोवा घेउ शकते. अद्ययावत प्रणालीमुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय गाडीचा वेग नोंदविला जातो. हा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तसे ई-चलान आपसूकच संबंधित वाहनचालकास पाठविले जातेनोव्हेंबरमध्ये आलेल्या इंटरसेप्टर वाहनांमधून १६ फेब्रुवारी २०२०पर्यंत अतिवेगाने जाणाऱ्या १६ हजार ७०० चालकांना चलान पाठविले असून ही दंडाची रक्कम १६ कोटी ७५ लाखांवर जाते. तर हेल्मेट न वापरणान्या ४ हजार चालकांकडून २१ लाखांवर दंड आकारला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. खरे तर अतिवेग म्हणजे अपघातांना निमंत्रण हा नियम विसरणा-या वाहनचालकांची संख्या प्रचंड आहे. महामार्गांवर सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठीच महामार्ग पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनांचा समावेश केला आहे. या वाहनांमध्ये स्पीडगन, काळ्या काचेचे प्रमाण तपासणे आदींचा समावेश आहे. महामार्ग पोलिसांकडून वर्षभर केलेल्या कारवाईतून ३६ कोटी २१ लाख रु.चा दंड वसूल केला असल्याचे आकडेवारी सांगते. याचा अर्थ काही वाहनचालक मनमानीपणे वाहने चालवितात, त्यामुळे त्यांना अपघातही होतात; कधी स्वत:ची चूक नसतांना अन्य वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याचेही उघड झाले आहे. मनुष्याच्या चुकीमुळे, हलगर्जीपणा अशा कारणांमुळे अपघात होत जिवीत हानी होणे हे अगदीच वाईट; मात्र दुर्दैवाने अशा घटना घडल्या आहेत. मात्र थांबायला हवे, त्यासाठी वाहतुकीचे नियम, कायदे सर्वांनी पाळायला हवेत!
वाहनचालकांनो नियम पाळा!