नवी मुंबई (प्रतिनिधी)- रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १९ वर्षीय महिलेवर तिघा नराधमांनी बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घट ने तील पिडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून उपरोक्त नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना पाठविलेल्या निवेदनात आरती धुमाळ यांनी म्हटले आहे की, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधात कठोर कायदा नसल्याने अत्याचाराचे प्रमाण __दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मदतीची याचना करणाऱ्या एका १९ वर्षीय महिलेवर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघा जणांनी अत्याचार करण्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडून आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाटयावर आला असून सदरचे हे प्रकरण तात्काळ निकाली लागावे यासाठी प्रयत्न करुन यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस विभागाकडून योग्य ती यंत्रणा राबविण्यात येऊन अडगळीत जागांचा सर्व्ह करुन त्याठिकाणी सीसीटिव्ही बसविण्यात यावेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
महिलेवरील अत्याचार प्रकरण ...! आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मनसे महिला सेनेची मागणी