पनवेल बसपोर्टची प्रतिक्षा संपणार -आ. प्रशांत ठाकूर


पनवेल (प्रतिनिधी) - आ.प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर पनवेल बसपोर्ट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ठेकेदार नेमून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल बसपोर्टचा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकल्याचे समोर आले आहे. या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या बसपोर्टची निर्मिती व्हावी, आणि प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी आ.प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्या अनुषंगाने या बसपोर्टच्या उभारणीची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत शासनाकडून देण्यात आल्याची माहिती आ. प्रशांत ठाकूर यांनी दिली. पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणाचे काम इडूस पार्क इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीला माहे डिसेंबर २०१८ मध्ये देण्यात आले असतानाही संबंधित ठेकेदाराने बस आगाराच्या आराखडयात त्रुटी आढळल्यामुळे अद्याप काम सुरु केले नाही. त्या अनुषंगाने सुधारित आराखडा मंजुरी करिता राज्य शासनाकडे सादर केला आहे, असे असतानाही बस आगारचे काम अदयाप सुरु केले नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आ.प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात दाखल केला होता. आहे.दैनदिन वापरात जी भाषा वापरतो तिच्या विषयी आपल्या मनात आदर आसणे आवश्यक आहे. ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येक भाषा आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरताना मराठी भाषेकडे दुर्लश करता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.