नवी मुंबई (प्रतिनिधी)- रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपीस तुरुंगातून सुटका करण्याबाबत मा. न्यायालयाकडून कोणताही आदेश पारित झालेला नसताना अज्ञात व्यक्तीने सह दिवाणी न्यायालय क स्तर व प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी , वाशी यांची _खोटी सही करुन आरोपी मोहम्मद उबेदुल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख याच्या नावाचा बनावट जेल रिलीज मेमो (सुटका पत्र) तयार करून मा.न्यायालयाची तसेच तळोजा जेल अधिकाऱ्यांची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायदंडाधिकारी ,प्रथमवर्ग न्यायालय वाशी न्यायालय येथील सहा.अधिक क्ष या पदावर कार्यरत असलेले रमेश लांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून । सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भादवि कलम ४२०, ४६५, ४६६, ,४६७, ४७१, व ४७४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी कि, मोहम्मद उबेदल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख नावाच्या व्यक्तीविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गु.र न. ४७/२०१९ अंतर्गत भादंवि कलम ४२०, ३४ अनव्ये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याबाबत आरोपी शेख याने सह दिवाणी न्यायालय क.स्तर व प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी, वाशी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता,न्यायालयाने आरोपी मोहम्मद उबेदुल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख याचा जामीन मंजुर केला होता. मात्र आरोपी मोहम्मद उबेदुल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख याने जामीनदार न दिल्याने त्यास जामीनावर मुक्त करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आरोपी शेख याची तळोजा कारागृहात खानगी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरोपी मोहम्मद उबेदुल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख याची तुरुंगातून सुटका करावी याबाबतचा वाशी न्यायालयाच्या नावाने असलेला जेल रिलिज मेमो तळोजा मध्यवर्ती कारागृह यांना प्राप्त झाला होता. मात्र या जेल रिलिज मेमो बाबत कारागृह अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी सदरबाबत खात्री करण्याकरीता ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिरी,वाशी न्यायालयाच्या न्यायाधीश शु.ज. कातकर यांची प्रत्यक्ष भेटु घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत खात्री केली असता, सदर मेमोवर न्यायालयाचा शिक्का व जावक क्रंमाक असल्याचे दिसून आले. मात्र ४थेसह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून आरोपी मोहम्मद उबेदल्ल उर्फ सय्यद मुदस्सर शेख याची तुरुंगातून सुटका करावी असा कोणताही आदेश झालेला नसल्याचे स्पष्ट होऊन अज्ञात व्यक्तीने वाशी न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शु.ज. कातकर यांची खोटी सही करुन न्यायालयाची तसेच जेल अधिका-यांची फसवणुक करण्याचे उद्देशाने वर नमुद आरोपीचा बनावट जेल रिलीज मेमो तळोजा जेल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची बाब पुढे आली असून याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्यायाधिशांची खोटी सही करुन आरोपीचे बनविलेबनावट सुटकापत्र'