वनखात्याने लक्ष घालण्याची मागणी... जाणी.. बिबट्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत


पनवेल (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील भोकरपाडा गावात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून हा बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. तसेच या परिसरातील दोन कुत्री देखील त्याने खाल्ल्याचे समोर आली आहे. तरी या संदर्भात वनविभागाने दखल घेवून त्याला जेरबंद करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या ग्रामीण भागात संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास बिबट्या येऊन जात असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या बिबट्यानी या परिसरातील दोन कुत्री देखील खाल्ल्याचे आढळून आले आहे. तर ग्रामस्थांच्या म्हणण्या नुसार जवळपास ८ कुत्री बिबट्याने खाल्याचे म्हणणे आहे. या घटनेचे माहिती वन विभागाच्या अधिका-यांना मिळाल्यानंतर वन अधीकारी सोनवणे यांच्या आदेशा नुसार दिवस रात्र या परिसरात गस्तीचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर घटनास्थळी पोचल्या नंतर अधिकाऱ्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहे. तसेच कुत्री देखील खाल्याच्या घटनेला दुजोरा वन अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या नुसार वन अधिकारी या परिरात ठिय्या मांडून असून बिबट्याचा शोध घेत आहे.