नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील ऐरोली क्षेत्रातील घणसोली शाखेअंतर्गत तळवली, गोठीवली तसेच पनवेल विभागातील तळोजा, नावडे, सुकापूर येथील वीजचोरीबाबत गुप्त माहिती मिळताच भांडूप नागरी परीमंडळाकडून वीजचोरांवर धडक कारवाई केली. या कारवाई अंतर्गत महावितरणकडून ५३ जणांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. __ भांडूप नागरी परिमंडळच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, सुरक्षा व अंमलबजावणी भांडूप, सहायक संचालक कैलास पटेकर व वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महावितरणच्या ऐरोली उपविभागाअंतर्गत येणा-या गोठीवली गावातील जय मल्हार अपार्टमेंट मधील सदनिका नंबर जी१ मध्ये १०१, २०१, २०२, ३०३, ४०१,४०२, ४०४, ५०२, ५०३, ५०४,गणेश आर्केड इमारतीमधील सदनिका नंबर २०६, ३०२, ३०३, ३०५, ४०४, गाळा क्रं ३ जयमाता अपार्टमेंटमधील सदनिका नंबर १०३, विघ्नहर्ता इमारतीमधील घर नं१,२,३,४, सोमनाथ कृपा इमारतीमधील सदनिका नंबर १०१, ३७६ तसेच चांगो पार्क येथील घर नंबर ३०२ यातील रहिवासी महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे उघडकीस आले आहेयात महावितरणची ४५,०५२ युनिटची वीजचोरी करून ६ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे उघड झाले आहे. गणेश आर्केड इमारतीमधील राहल पवार यांनी रु.१ लाख २४ हजार ८०, जयवंत सिंग परते यांनी रु. ५० हजार २६० चिन्मय चकवती यांनी दुकानासाठी रु.१,२४,१८० ची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच गोठीवली नाका तळवली येथील पांडुरंग म्हात्रे यांनी त्यांच्या बेकारी व्यवसायाकरिता रु.५७,८३०बळीराम पाटील यांनी सलुनच्या व्यवसायाकरिता रु.२१,३०० व मदन पाटील यांनी चायनीज व्यवसायाकरिता११,३६० रु.ची वीजचोरी केल्याचे उघड झालेले आहे. याप्रकरणी विद्युत कायदा अधिनियम २००३ चे कलम १२६ व कलम १३५ अन्वेय रबाळे वाशी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पनवेल तालुक्यातील नावडे, तळोजा गावातील ८० रहिवाशांनी अनधिकृतपाने वीजवापरून महावितरणच्या २,९१,२३४ युनिटची वीजचोरी करून सुमारे ४२ लाख ४५ हजार ७६० रुपयांचे नुकसान केल्याचे उघड झालेले आहे.नावडे येथील पंढरीनाथ पाटील यांनी रु.२८,१३०, संजय पांडुरंग पाटील यांनी रु.४०,०९० व बाबाजी रामदास बेलकर यांनी रु.४३,५१०ची वीज चोरी केल्याचे उघड झालेले आहे. तसेच तळोजा येथील रजाक रहिमुद्दीन शेख यांनी रु. १,१५,३१०, नसीमा शरफूद्दिन दिवान यांनी रु.१,१४,४४० व ए सामद हसनमिया पटेल यांनी रु.१,२२,२२० ची वीज चोरी केल्याचे उघड झालेले आहेयाप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात विद्युत कायदा अधिनियम २००३ चे कलम १२६ व कलम १३५ अन्वये ४४ जणांविरुध्द वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुकापूर गावातील परशुराम गंगारण जितेकर यांनी त्याच्या हॉटेल व्हिलेजच्या व्यवसायाकरिता रु.१,५३,९५०, प्रियंका टिफिन सर्विसेस यांनी रु.६,७२० व कलावती दिलीप गुप्ता यांनी रु. १६,२०० तर रुपेश भगत यांनी रु.३८,५३२ व चांगदेव ठाकूर यांनी रु. ५४.१४० वीजचोरी केल्याचे उघड झालेले आहे.
ऐरोली. पनवेल भागातील वीजचोरांवर धडक कारवाई