नवी मुंबई कुंभार समाज मंडळाचा १० वा वर्धापन दिन उत्साहात


ऐरोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई कुंभार समाज मंडळाचा १० वा वर्धापन दिन, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, समाजभूषण पुरस्कार वितरण, तसेच महिलांचा हळदी-कुंकू समारंभ ऐरोलीतील जानकीबाई मढवी मंगल कार्यालयात काल मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. संजीव नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आदींसह महाराष्ट्रकुंभार समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश दरेकर आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष मोहन कुंभार, कार्याध्यक्ष संतोष चौलकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मंडळाच्या महिला अध्यक्षा पुष्पांजली कुंभार, समाजसेवक सुदर्शन जिरगे आदींसह समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.