नेरुळमध्ये डॉक्टरांच्या कार्यशाळेतून मार्गदर्शन... कोरोना व्हायरसपेक्षा जलद गतीने पसरत आहे अफवांचा व्हायरस


नवी मुंबई (प्रतिनिधी) - चीनसोबतच जगातल्या अनेक देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत 14,000 पेक्षा जास्त लोकांना या विषाणूची बाधा झालेली आहे. झपाट्याने पसरणारा हा विषाणू एक जागतिक आपत्ती असल्राचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जाहीर केले आहे. भारतातील केरळ व अहमदाबाद येथे रुग्ण मिळाल्यामुळे या व्हायरसबाबत अनेकांच्या मनात चिंता असून सोशल माध्यमांमार्फ़त पसरल्या जाणार्‍या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्रे डॉक्टरांसाठी आयोजित कार्यशाळेतून नागरीकांना मार्गदर्शनपर सूचनांची माहिती देण्यात आली.
कोरोना व्हायरस प्राण्यापासून मनुष्यात व व्हायरस बाधीत मनुष्यापासून निरोगी मनुष्यात हवेमार्फत पसरला जातो. या विषाणूसाठी कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नाही. कोरोना विषाणू हा प्राणीजन्य असूनही हा विषाणू नक्की कोणत्या प्राण्यांपासून होतो याबाबत माहिती उपल्बध नाही. अचानक येणारा ताप, खोकला, घसा बसणे, दम लागणे व श्‍वास घेण्यास त्रास होणे अशी आजारांची लक्षणे आहेत. मुळात हा आजार बाधीत असणार्‍या रुग्णांच्या खोकन्यामुळे हवेतून आजार पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
या कार्यशाळेत नवी मुंबईतील 40 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत इन्फेकशन कंट्रोल साहाय्यक डॉ. अनीला प्रबिल, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. आर सरस्वती जरंती व  डॉ. शालिनी गोरे, तेरणा हॉस्पिटलच्रा क्षररोग निरंत्रण विभागाच्रा सहरोगी प्राध्रापिका डॉ. दीपिका उगाडे रांनी मार्गदर्शन केले, तसेच प्राध्रापिका डॉ मिताली नाईक रांनी महाराष्ट्र सरकारने रा व्हाररसबाबत निरोजित केलेल्रा सुविधांची माहिती दिली. 
खोकल्रावर, शिंकल्रानंतर, आजारी व्रक्तीची काळजी घेताना, स्वरंपाक करण्रापूर्वी, जेवणापूर्वी, शौचानंतर आणि प्राण्राचा सांभाळ केल्रानंतर आणि त्रांची विष्ठा काढल्रानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे.  नागरिकांनी प्रतिबंधक तत्त्वांचे पालन केले तर सद्यःस्थितीत हा आजार भारतात वेगाने पसरण्राची शक्रता नाही; दुर्दैवाने काही बाधित रुग्ण आढळल्रास त्रांच्रावर रोग्र उपचार केले तर ते लगेच बरे होतात त्रामुळे मृत्रुदर आटोक्रात राहील असे मत रा कार्रशाळेत उपस्थित डॉक्टरांनी व्रक्त केले.