पनवेल (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचा कारभार फसव्यारितीने चालला असल्याचा आरोप करीत आज, सकाळी १० वाजल्यापासून पनवेल तहसील कार्यालयावर पनवेल भाजपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जनादेशाचा अपमान करून _सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरी मुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर ढासळती कायदा सुव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना महाविकास आघाडी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये निर्यणक्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाही, त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारला त्याचा जाब विचारण्यासासाठी आ.प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात आज पनवेलमध्ये तहसील कार्यालयावर धरणे