उरण (प्रतिनिधी) - कल्पना उर्फ जया तुकाराम घाणेकर या महिलेच्या खून प्रकरणातील तिस-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी एक महिला व तिच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. ___कल्पना उर्फ जया तुकाराम घाणेकरवर निघृणपणेवार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह चिरनेर परिसरातील निर्जनस्थळी टाकला होता. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना धागेदोरे हाती लागताच त्यांनी मयत महिला कल्पना उर्फजया तुकाराम घाणेकर हिची सवत तबसुम मुक्तार अली संग्राम (४५), तिची मुलगी रुसार मुक्तार अली संग्राम(२१) या मायलेकींना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली. तर तिसरा आरोपी हसन हुसेन शेख(३०) याला काल रात्री अटक करण्यात आली. काल न्यायालयात उभे केले असता ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
खून प्रकरणातील तिसरा आरोपी अटक