भाजपचे अधिवेशन आणि मनपा निवडणूक

भाजपचे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन नवी मुंबईतील नेरुळ येथे संपन्न झाले. राज्यातील सत्तांतर आणि नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर झालेल्या या अधिवेशनाकडे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्ष समर्थकांमध्ये उत्साह होता आणि पक्षातील प्रमुख नेते काय बोलतात, कोणता आदेश देतात आणि एकूणच कशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते याबाबतची उत्सुकता त्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्ष समर्थकांमध्ये होती. अन्य पक्षांच्या नेते आणि राजकीय विश्‍लेषकांनाही हे अधिवेशन वेगळे असावे असे वाटले असेल तर आश्‍चर्य नसावे. त्यानुसार नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल या अधिवेशनात वाजले गेले हे स्पष्ट होतांनाच प्रमुख वक्त्यांनी शिवसेनेवर केलेली टीका आणि हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्यातील वादानेच पडेल, असा केलेला अंदाज कितपत खरा ठरेल, याचे उत्तर काळ देईल. मात्र त्याचबरोबर अधिवेशनात मुंबई, नवी मुंबई महापालिका निवडणूक हा मुद्दा अपेक्षेइतका चर्चिला गेला नाही, दोन दिवसांतील भाषण, चर्चांदरम्यान दोन्ही महापालिका भाजप जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त करतांनाच औरंगाबादमध्ये शिवसेना काय करते याकडे आपले लक्ष असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य असो वा शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्त्वं गुंडाळून ‘मातोश्री’वरील एका कोपर्‍रात ठेवली आहेत आणि हे सरकार महाराष्ट्राच्रा जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्रामुळे भारतीर जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा पक्षाचे प्रदेशाध्रक्ष चंद्रकांत पाटील रांनी व्यक्त केलेला निर्धार पाहता शिवसेनाच या पक्ष नेत्यांच्या टीकेच्या अव्वल स्थानी होती हेही स्पष्ट होते. त्यामुळे महापालिका निवडणूक निती कशी असेल, विविध पक्षातून भाजपमध्ये आलेल्या समर्थकांचे मनोमिलन कसे होईल, सत्ता मिळविण्यासाठी पक्ष नेते, पदाधिकारी यांना ठोस सूचना दिल्या जातील, अशी अपेक्षा असतांना  शिवसेनेवर टीका करणे या मुद्याला महत्व दिल्याचे दिसते. विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र रेऊन स्थापन झालेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून करण्रात रेत असतानाच उद्धव ठाकरे रांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरातीलकार्यक्रमात बोलतांना,  आमचे सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्रात हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा’, अशा शब्दात त्रांनी भाजपला खुले आव्हान दिले होते. त्रावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रांनी शिवसेना आणि मुख्रमंत्री उध्दव ठाकरे रांना प्रतिआव्हान देतांना, सरकार पाडण्राची आम्हाला गरज नाही ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्रा, असे सांगितले. शिवाय 370 कलम रद्द करणे, राममंदिर, सीएए, स्वातंत्र्रवीर सावरकर असे मुद्दे पुढे केेले. आधीच्या राजवटीत भाजपने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देणे व महापालिकेत सत्ता येईल असे सांगत असताना नवी मुंबईकरांसाठी काय केले जाईल हे सांगितले असते तर कार्यकर्त्यांना ते लोकांसमोर मांडणे शक्य झाले असते. किंबहुना महापालिकेवर सलग 25 वर्षे सत्ता राखून ठेवणारे माजी मंत्री आणि भाजपचे आ. गणेश नाईक यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतांनाच दुसर्‍यांदा भाजपमधून  निवडून आलेल्या आ. मंदा म्हात्रे यांच्या कामांचीही माहिती दिली गेली असती, तरी भाजपकडे आकृष्ट होणारे मुद्दे लोकांना माहिती झाले असते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते अन्य मतदारांपुढे नेण्यास उपयोगी झाले असते. असो. भाजपची आणखी काही राजनीती, कूटनिती असू शकते; कार्यकर्ते, पदाधिकारी यांना अन्य गुप्त सूचना केल्याही जातील. येत्या काही दिवसांत निवडणुकीची आचारसंहिता सुरु होईल आणि प्रचारात रंग  येत भाजप विरुध्द महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय कलगीतुरा पहावयास मिळेलही. राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवे राजकीय समीकरण निर्माण झाले. त्यानुसार निवडणूका होण्याची तयारी सुरु आहे. नवी मुंबईतील हा पहिला प्रयोग कोणाला फायदेशीर आणि तोटादायी ठरतो, हे पहायला मिळेल. महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत मेळावा घेतला, आता भाजपनेही राज्यव्यापी अधिवेशन घेतले; दोन्ही पक्षांचे निवडणूक प्रचाराचे बिगुल वाजले आहे. नवी मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल देतात, याचा अंदाज येण्यासाठीही आणखी काहीसा अवधी जावा लागेल!