नवी मुंबई (प्रतिनिधी)- कर्नाळा बँकेकडून खातेदारांना पैसे दिले जात नाही, बँकेत झालेल्या अनियमिततेमुळे ठेवीदार आणि खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. खातेदारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आम्हाला परत करा, अशी जोरदार मागणी करीत कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून काल पनवेल शहरातील बँके च्या मुख्य कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पैसे आमच्या मेहनतीचे नाही कुणाच्या बापाचे.
.
परत करा आमचे पैसे परत करा अश्या स्वरूपाचे हाती फलक घेऊन मोठ्या प्रमाणात ठेवीदार,खातेदार या मोर्चात सहभागी झाले होते. कर्नाळा बँकेत ५१२ कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचा आरोप आहे. बँकेचे अध्यक्ष माजी आ.विवेक पाटील अनेक दिवसांपासून आश्वासने देत ० आहेत, मात्र बँकेतील रक्कम दिली जात नाही. आ.महेश बालदी आणि आ.प्रशांत ठाकूर यांनी बँकेच्या ठेवीदार, खातेदारांना एकत्र करून बँकेविरोधात लढा सुरू केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लढ्याचा भाग म्हणून गुरुवारी बँकेवर हा मोर्चा काढण्यात आला होता.