ऐरोली (प्रतिनिधी)- अखंड हरिनाम सप्ताहाची धार्मिक परंपरा गोठीवली ग्रामस्थानी जोपासली असून यंदाचे हे ८४ वे वर्ष आहे. यानिमित्त गोठीवलीगावात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवार दि. २९ फे बुवारी ते ७ मार्च या कालावधीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या हरिनाम सप्ताहाच्यानिमित्ताने गोठीवलीगावात हरी नामाचा गजर होणार आहे. या हरिनाम सप्ताह कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ७ ते १० वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ वाजता गाथ्यावरील भजन, सायंकाळी ४.३० ते ५.३०. वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, आणि दररोज रात्री भजन असा दैनंदिनी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या हरिनाम सप्ताहात प्रामुख्याने शनिवार दि. २९ रोजी देवाची आळंदी येथील कीर्तनकार ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री यांचे तसेच रविवार दि. १ मार्च रोजी जालन्याचे ह.भ.प. आदिनाथ महाराज लाड, सोमवार दि २ मार्च रोजी पंढरपुरचे ह.भ.प.श्र सद्रू चैतन्य महाराज देनगूलकर, मंगळवार दि. ३ रोजी बारामतीचे ह.भ.प. श्री महंत प्रमोद महाराज जगताप, बुधवारी दि. ४ मार्च रोजी आळंदी येथील ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, गुरुवार दि. ५ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली __शिंदे ( अध्यापक, वारकरी शिक्षण संस्था,आळंदी) आणि शुक्रवार दि. ६ रोजी इगतपुरीचे मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प.माधव महाराज घुले यांचे किर्तन होणार आहे. त्याच दिवशी रात्री ११ नंतर नवी मुंबई परिसरातील सर्व वारक-यांचे iskcondesiretceसामुहिक जागर भजन होणार आहे. शनिवार दि ७ मार्च रोजी ह.भ.प.माधव महाराज घुले यांच्या काल्याचे किर्तन होणार आहे.तसेच दपारी १२ ते २ वाजता महाप्रसाद आणि रात्री गोठीवली गावातून भव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याहरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणसुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोठीवली ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
गोठीवलीत अखंड हरिनाम सप्ताहाची ८४ वर्षाची धार्मिक परंपरा २९ फेबुवारी ते ७ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन