पनवेल व उरण तालुक्यांचा समावेश असलेल्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्हेगारीचा मुद्दा जेव्हा चर्चेत असतो तेव्हा गुन्हेगारीची विविध रुपे इथे पहावयास मिळत असल्याचे स्पष्ट होत आले आहे. अलिकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक स्वरुपातील गुन्हे हे खातेदारांचे बँकांमधून थेट गेल्याची उदाहरणे घडली आहेत, घडत आहेत. कुठलेसे अमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते, नोकरी-व्यवसायाचे कारण सांगून बँक खाते क्रमांकासह अन्य माहिती घेतली जाते आणि हजारो, लाखो रुपयांना चुना लावल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. घरात कोणी नसल्याची संधी साधत घर लुटण्यापासून ते चेनचोरी, हत्या आदी प्रकार घडत असतात आणि वाहनचोरीचे प्रकारही घडत असतात. एकूणच विविध गुन्ह्यांबाबतचा तपशील पोलिसांकडून दरसाल जाहीर केला जातो. त्यातून गुन्हे वाढले, कमी झाले यासह अन्य माहिती सांगितली जाते. मात्र एकूण सारे चित्र पाहता गुन्हे घडत असतात आणि फसवणूक करणारेही आपली कामे करीत असतात, पुढे तपासाचे कार्य पोलिस त्यांचे कर्तव्य म्हणून पार पाडत असतात. एका चोरीच्रा गाडीमध्रेच स्वतःचे घर बनवून त्राद्वारे मोबाईल व इतर गाड्या चोरणार्रा सराईत गुन्हेगाराला पनवेली शहर पोलीस पथकाने उत्तर प्रदेश रेथून केलेली अटक ही ताजी घटना खळबळजनकच म्हणावी लागेल. काही चोरटे, गुन्हेगार इतके काही निगरगट्टपणे आणि बेधडक व बेमालुमपणे वावरतात की आपण काही वाईट, बेकायदेशीर करीत आहोत, लोकांची लूटमार करीत आहोत... यासारखी त्यांना जाणीव राहत नाही. अशा लोकांच्या पोलिस कधी तरी मुसक्या आवळतातच, मात्र तोवर अनेकांचे नुकसान झालेले असते आणि असे अन्य गुन्हेगारही आले चोरीचे धंदे करीतच असतात. ताजा प्रकरणात उत्तरप्रदेशमधील गाझीयाबाद रेथून अटक केलेला आरोपी हुसेन आरिफ साजिद हुसेन (42 रा.कल्राण) हा सराईत गुन्हेगार असून त्राने पनवेल परिसरातून अल्टो गाडी चोरुन नेली होती. रा संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्रात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोठ्या खुबीने तपास करीत उत्तरप्रदेशमधील साहेबाबाद पोलीस ठाण्राच्रा हद्दीतून पकडून आणले. त्राच्राकडून 2 मोबाईलसह चोरीची मारुती कंपनीची अल्टो गाडी ताब्रात घेण्रात आली आहे. आरोपी हुसेन हा मौलानाचा वेश धारण करून मस्जिदमध्रे आंघोळ करून व तेथेच नमाज पडत असे व त्रानंतर भुरट्या चोर्रा, करुन चोरलेल्या कारमध्येच झोपत असे, अशीही माहिती आता उघड झाली आहे. पोलिसांच्या तपासपथकाची ही कौतुकस्पद कामगिरी आहे, हे निश्चित. आता मात्र या आरोपीला कठोर सजा होईल, हे पहायला हवे. तथापी गुन्हेगारी का वाढते; चोर, लुटारु, बलात्कारी, घरफोडी करणारे, फसवणूक, चेन चोरी करणारे, दुचाकी-चारचाकी वाहने पळविणारे यासह आताच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचा फंडा वापरत लोकांना गंडा घालणार्यांपैकी अनेकजण पोलिसांना सापडत नाहीत, जे सापडतात त्यांना जामीन मिळतो, हे कुठे तरी थांबायला हवे. काही चोर वा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागतात तेव्हा त्यांनी आधी केलेल्या गुन्ह्यांचीही माहिती मिळते मग त्यांना आधीच सोडले का जाते?... असेही प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणजे गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तरी त्या गुन्हेगारांना प्रत्यक्षात कठोर शिक्षा होतेच असे नाही, ही स्थिती कधी बदलणार? महिलांवर अत्याचार, बलात्कार करणारेही जामीनावर सुटतात आणि अगदी महिलांना जाळणारेही कधी पळून जात असतात; हिंगणघाट प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला तरी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्याला शिक्षा कशी दिली जाणार? काही खटल्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असते, न्यायालयाने फाशी सुनावूनही ती दिली जात नाही, हे निर्भया प्रकरणातील आरोपींच्याबाबत जे घडत आहे त्यावरुन स्पष्ट होत आहे. जनतेचा संताप वाढतोय, गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे ही त्यांची मागणी योग्यच आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय गुन्हे कमी होणे शक्य नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी!