पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल परिसरात बेकायदेशीरित्या गांजा बाळगणाऱ्या दोघा इसमांना अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी पकडले असून दोघांकडून गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तालुक्यातील अॅमेटी कॉलेज हॉस्टेल परिसरात आरोपी सत्यशिल शांतरजान मोहती सत्यशिल शांतीरंजन मोहंती (२२) हा गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची माहिती अमली पदार्थ । विरोधी पक्षक गुन्हे शाखा यांना मिळताच सपोनि माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या इसमास ताब्यात घेतले आहे. अशाच प्रकारे निसर्ग गाया हॉटलावळ पीनाय गार्डनच्या हॉटेलजवळ पंढरीनाथ भोपी (३४) हा इसम सुद्धा बेकायदेशीररित्या गांजा ताब्यात ठेवत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क), २० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल परिसरात गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक