मुंबई (प्रतिनिधी) माजी आ. विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस् अॅकॅडमीची चौकशी करण्याचे आश्वासन । राज्याचे धर्मादाय आयुक्त आर. एन. जोशी यांनी दिले आहे. जिल्हा विशेष लेखापरिक्षक,सहकारी संस्था अलिबाग-रायगड यांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, ज्या ६३ व्यक्तीच्या नावे बोगस कर्ज दाखवलेले आहे, त्या कर्ज खात्यातील ब-याच रक्कमा ह्या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी या संस्थांकडे वर्ग झाल्याचे नमुद केलेले आहे. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी या संस्था महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये नोंदलेल्या असल्याने व कर्नाळा बँकेत झालेल्या अपहरापैकी बरयाच रक्कमा या दोन्ही संस्थेकडे वर्ग झाल्याने सदरच्या संस्थातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केलेला असावा. त्यामुळे या दोन्ही संस्थांची महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम १९५० कलम ३७ नुसार लेखापरिक्षण करून कलम ३३(४) अन्वये चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते किरिट सोमैय्या, आ.प्रशांत ठाकूर, कुंडलिक काटकर यांनी महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय
धर्मदाय विभागाकडून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टसह कर्नाळा स्पोर्टस् अॅकॅडमीची होणार चौकशी।